• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

” आपला जिल्हा आपले उपक्रम ” मध्ये तरसोदचे शिक्षक विजय लुल्हे यांच्या उपक्रमाचा समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आयटीसेलचा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘आपला जिल्हा आपले उपक्रम ‘ भाग चार या डिजिटल बुकचे प्रकाशन नुकतेच नाशिक येथे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या हस्ते झाले.जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांकडून उपक्रम मागवण्यात आले होते त्यातून निवड झालेले सर्वोत्कृष्ट उपक्रम डिजिटल बुकमध्ये प्रकाशित झाले.या बुकमध्ये जळगाव तालुक्यातील तरसोद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी : वैश्विक व्यक्तिमत्त्व ” या दर्जेदार मुल्याधिष्ठित उपक्रमाची निवड होऊन तो उपक्रम पंचवीस अनुक्रमांकाने समाविष्ट करण्यात आला .
विद्यार्थीदशेत संवेदनशीलकाळात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वैश्विक व्यक्तिमत्त्वाचा समग्र परिचय चरित्रातील ऐतिहासिक घटना व स्वातंत्र्य लढयातील जनआंदोलनांच्या अनुषंगाने देणे.डोळसपणे महात्म्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसीत व्हावा या उद्दिष्टाने उपरोक्त उपक्रम महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या औचित्याने राबविण्यात आला.महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यांची महती रुजविण्यासाठी विविधांगी शालेय व शाळाबाह्य उपक्रम लुल्हे यांनी स्वखर्चातून राबविले.शाळेत वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रंगभरण स्पर्धा,मूल्य कथाकथन ,अभिवाचन,पूज्य गांधींजींचे दैनिक सुविचार लेखन व संकलन,गांधी रीसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने “मोहन ते महात्मा” जीवन चरित्र चित्र प्रदर्शन ,परिसर स्वच्छता कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या चरित्र पुस्तकांची पारितोषिके दिली.समाजशास्र महाविद्यालयात ” विचार मंथन व पोस्टर्स प्रदर्शन ” कार्यक्रम निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेतला.महात्मा गांधीजींवरील लोकराज्य मासिकाचे ‘ युगपुरुष ‘ दिडशे विशेषांक व महात्मा गांधीजीप्रणीत ‘ सात सामाजिक पातके ‘ तसेच ‘ एकादश व्रते ‘ स्वसंकलित दिडशे पोस्टर्स १५० व्या गांधी जयंतीच्या औचित्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते दलुबाबा जैन,महात्मा गांधी अभ्यासक डॉ.भुजंगराव बोबडे,उदय महाजन,किशोर कुलकर्णी यांसह शिक्षण ,सामाजिक व अन्य क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी यांच्यासह वृतपत्रांच्या संपादकांना मोफत भेट दिली.महात्मा गांधीजींवरील उपक्रम विजय लुल्हे यांनी सर्वस्तरावर पोहोचवून प्रबोधन केल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे .


 

 

Previous Post

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

Next Post

जळगावातील विठ्ठलपेठ येथील प्रौढ बेपत्ता ; शनीपेठ पोलीसात नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील विठ्ठलपेठ येथील प्रौढ बेपत्ता ; शनीपेठ पोलीसात नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon