• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खरेदीस आलेल्या महिलेचे दागिने लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in क्राईम, जळगाव
0

दोन महिलांसह रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – सध्या दिवाळीची बाजारात खरेदीला मोठी गर्दी जमत आहे. गुरूवारी सायंकाळी सुभाष चौकात खरेदीसाठी आलेल्या महिलेचे ७२ हजार रूपयांचे दागिने रिक्षा चालकासह इतर अज्ञात दोन महिलांनी लंपास केल्याची घटना बोहरागल्ली ते राधाकृष्ण मंगल कार्यालय दरम्यान घडली. याप्रकरणी रिक्षा चालकास अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे.

मनिषा ज्ञानेश्वर शिंदे (४८, रा. मेहरूण) ह्या कुटुंबियांसोबत गुरूवारी १२ नोव्हेंबर रोजी बाजारात वस्तू खरेदी आणि सोन्याच्या दागिन्यांना दुरूस्ती करण्यासाठी दुपारी ३ वाजता शहरातील सुभाष चौकात आल्या होत्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांनी दुरूस्तीसाठी टाकलेले दागिने दुकानातून घेतले. त्यानंतर घरी परतण्यासाठी त्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिलाल चौकात जाण्यासाठी बोहरा गल्लीजवळ रिक्षात बसल्या. आधीच रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी होत्या. त्यातील एक महिला खाली उतरली व तिने मनिषा यांना मध्ये बसण्यास सांगितले. त्यानुसार त्या दोन्ही महिलांच्या मध्ये बसल्या.

बोहरा गल्लीतून रिक्षा मेहरूणच्या दिशेने निघाली. दरम्यान, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ चालकाने रिक्षा थांबविली. नंतर मनिषा शिंदे यांना खाली उतरविले व मी या दोन महिलांना सोडून येतो. तुम्ही इथेच थांबा सांगून चालक प्रवासी भाडे न घेता रिक्षा घेवून तेथून निघून गेला. बराच वेळ होवूनही रिक्षा येत नसल्यामुळे अखेर मनिषा यांनी दुसऱ्‍या रिक्षाने घर गाठले.

मनिषा शिंदे ह्या घरी पोहोचल्यावर त्यांनी त्यांची पर्स तपासली. त्यावेळी त्यांना २८ हजार ८०० रूपये किंमतीचे सोन्याचे काप व ४३ हजार २०० रूपये किंमतीचे सोन्याचे कानाचे झुमके गायब झालेले दिसले. त्यांनी पर्समध्ये शोध घेतला. मात्र, मिळून न आल्याने रिक्षात बसलेले असताना ते कुणीतरी चोरून घेतले असल्याची खात्री त्यांना झाली. अखेर मनिषा शिंदे यांच्या फिर्यादीरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच, पोलिसांना रिक्षाचालक व त्यातील प्रवासी महिलांवर संशय बळावला. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक मिळून आला. अखेर रिक्षाचालक सैय्यद हुसेन सैय्यद हसन (२८, रा़ पिंप्राळा-हुडको) याला पोलिसांनी अटक केली. तसेच रिक्षाही जप्त केली असून सैय्यद हुसेन याला शुक्रवारी दुपारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणातील इतर व्यक्तींचाही पोलीस शोध घेत आहेत.


 

 

Previous Post

महिलेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

कोरोना रूग्णांची सेवा करुन कोरोना योध्दांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना रूग्णांची सेवा करुन कोरोना योध्दांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon