जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, विविध समाजांचे, प्रलंबित प्रश्न आहेत. महिला अत्याचार वाढले आहेत. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाचे आधिवेशन अधिक दिवस चालविण्याची गरज असल्यामुळे अधिवेशन १५ दिवस चालवावे, अशी मागणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.
कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईत बुधवारी पार पडली. यानंतर आ. गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. कोरोनाचे कारण जरी असले, तरी एक अधिवेशन नागपूरला कायद्यानुसार झाले पाहिजे. हे बंधनकारक आहेत. राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत, विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे वर्षभर प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे अधिवेशन १५ दिवस चालवावे अशी मागणी मुखमंत्र्यांकडे केली आहे. अधिवेशन नागपुरात घ्या अशी आमची मागणी आहे. आताचे अधिवेशन मुंबईत घेतले तर, अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपुरात घ्या असे आमचे म्हणणे आहे. सरकारला महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चाच करायची नसल्याचे चिन्ह दिसत असून कमी दिवसांचे अधिवेशन ते घेत आहेत. सरकारचा पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचेही आ. गिरीश महाजन म्हणाले.