जामनेर (प्रतिनिधी) – बिहारमधील एनडीएचे सरकार आल्याबद्दल जामनेरमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
जामनेर शहरातील नगरपरिषद चौकात भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक नाना बाविस्कर, नगरसेवक प्रशांत भोंडे यांच्यासह उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.