• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करीत जीवे ठार मारले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in क्राईम, जळगाव
0

पारोळा येथील धक्कादायक घटना, संशयिताचाही आत्महत्याचा प्रयत्न

पारोळा (प्रतिनिधी)  तालुक्यातील शहरात 20 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला कासोदा येथे नेत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जबरदस्ती विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जबर जखमी असलेल्या तरुणीला बसस्थानकाच्या मागे फेकून नराधमांनी डाव साधला. उपचारादरम्यान मंगळवारी दहा नोव्हेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

पारोळा येथील साने गुरुजी कॉलनी रहिवासी असलेल्या विद्यार्थिनीच्या 32 वर्षीय मामाने पारोळा पोलीस स्टेशनला मंगळवारी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दोन क्रमांकाची बहीण टोळी ता. पारोळा येथे राहते. बहिणीला तीन मुली व दोन मुले आहेत. त्यातील क्र.2 ची मुलगी ही पारोळा शहरातील आर. एल. महाविद्यालयात विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात पदवीचे शिक्षण घेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी भाची फिर्यादीकडे राहण्यास आली होती. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी मामा हे बाजारात गेले होते. दुपारी तीन वाजता घरी आले, त्यावेळी भाची घरात दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली मात्र मिळून न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी ८ नोव्हेंबरला भाची बेपत्ता झाल्याची पारोळा पोलीस स्टेशनला नोंदवली. त्यानंतर ८ तारखेलाच संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की, पारोळा कुटीर रुग्णालयात एका तरुणीस विषबाधा झाल्यामुळे दाखल केले आहे. त्यामुळे त्यांनी खात्री करण्यासाठी कुटीर रुग्णालयात धाव घेतली. तेथे उपचार घेत असलेली तरुणी त्यांची भाची असल्याचे त्यांनी ओळखले. त्यानंतर त्यांनी त्यांची बहीण व भाचीची आई यांना माहिती देत पारोळ्याला बोलविले. पुढील उपचारासाठी त्यांनी धुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिकाने हलविण्याचा निर्णय घेतला.

रुग्णवाहिकेत नेत असताना फागणे गावाजवळ रुग्णवाहिका आली असताना भाचीला शुद्ध आली. त्यावेळी तिने फिर्यादी मामा, तिची आई व मोठी बहिण यांना घटना कथन केली. तिने सांगितले की, टोळी येथील शिवानंद शालिक पवार हा मैत्री करण्यासाठी फोन करण्याचा सारखा इशारा करीत असे. पण मी लक्ष देत नव्हती. त्यामुळे शिवनंदन शालीक पवार, पप्पू अशोक पाटील, अशोक वालजी पाटील यांनी माझ्यावर अतिप्रसंग करून सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच पारोळा येथून अपहरण करून गुंगीचे औषध देत कासोदा गावाच्या जवळ अज्ञात ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला आहे. त्यास विरोध केला असता तिघांनी व एक अज्ञात महिलेने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत, आम्ही सांगू तसे वाग, नाहीतर तुला मारून टाकू अशी दमदाटी केली होती. यामुळे माझ्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असल्याचे तिने मामा व आईला सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे तिच्यावर धुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.

मंगळवारी पहाटे उपचार घेत असताना तिची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे पारोळा शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी चर्मकार संघाचे पदाधिकारी भानुदास वसावे, सामाजिक कार्यकर्ते पिरन अनुष्ठान यांनी पारोळा पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. दोषी संशयित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत असून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्याशी “केसरीराज”ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी शिवनंदन शालीक पवार व अशोक वालजी पाटील या संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करीत आहे. तसेच शिवनंदन पवार याने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तेथे सुद्धा पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. या प्रकरणी लवकरच दोषींना अटक करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही कानडे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

तेजस्वी यादव यांच्या यांच्या मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगताना दिसत आहे.

Next Post

बिहारमध्ये सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बिहारमध्ये सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon