मुंबई (वृत्तसंथा) – साऊथ सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. खुद्द चिरंजीवीनंच सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. आचार्य या आगामी सिनेमाआधी त्यानं कोरोना टेस्ट केली होती. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

आपल्या पोस्टमध्ये चिरंजीवीनं लिहिलं की, प्रोटोकॉलनुसार आचार्यची शुटिंग करण्याआधी मी कोविड टेस्ट केली होती. दुर्दैवानं माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. सध्या मी होम क्वाॅरंटाईन आहे. जे कोणी गेल्या 5 दिवसांत मला भेटले आहेत, त्यांनी सर्वांनी कोविड चाचणी करावी अशी मी विनंती करतो. मी माझ्या तब्येतीबद्दल अपडेट देत राहील.







