मुंबई (वृत्तसंथा) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. फटाकेबंदीच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. फटाके बंदीचा निर्णय घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्वीट करत जनतेला आवाहन केलं आहे.
लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी आज जे सांगितलं, त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीमध्ये कमीत कमी फटाके फोडा आणि प्रदूषण थांबवा. प्रकाशाचं पर्व साजरं करा, दीपोत्सव साजरं करा. मास्क नक्की लावा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची आणि समाजाची काळजी घ्या. असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं.








