तक्रार निवारण सभेत शिक्षकांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – कार्यालयात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या कामांची अडवणूक केली जाते. संबंधित भेटल्याशिवाय प्रकरण मार्गी लागत नाही. अनेक दिवस प्रकरणे प्रलंबित असतात. याबाबत संघटनांनी नाराजी व्यक्त करून यापुढे कार्यालयातील दप्तर दिरंगाई खपवून घेणार नाही. तसेच संबंधितांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या तक्रार निवारण सभेत रविवारी शिक्षकांकडून करण्यात आली.
जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व सहयोगी शिक्षक संघटनांची तक्रार निवारण सभा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील, सचिव जी.आर.चौधरी, शिक्षक संघाचे सचिव एस.डी.भिरुड, एस.एन.पाटील, एन.ओ.चौधरी, अरुण सपकाळे, डी.ए.पाटील, डिगंबर पाटील, एस.के.पाटील, सी.एस.चौधरी, उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, डी.एम.देवांग, उपनिरीक्षक आर.एल.माळी, अधीक्षक किशोर वानखेडे, वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा, सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, अजिज शेख आदी उपस्थित होते.
सभेत मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापक मान्यता, प्रलंबित शिक्षक – शिक्षकेतर मान्यता, वैद्यकीय देयकांच्या मान्यता, शालार्थ प्रणाली प्रमाणपत्र, सातवा वेतन आयोग पहिला हप्ता, पी.एफ.व डी.सी.पी.एस.हिशोबाच्या पावत्या मिळणेबाबत, वैद्यकीय प्रतिपूर्तीची व फरकाची बिले मिळणेबाबत, संच मान्यता दुरूस्ती, राष्ट्रीयकृत बँकेत पगार होणेबाबत, वेतनेतर अनुदान, इ.बी.सी. शिष्यवृत्ती मिळणेबाबत, सेवा निवृत्त कर्मचारी यांना सातव्या
वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.