जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील आदिवासी पाडे पान शेवडी, अर्जुन पाडा, बढाई , कुंड्या पानी या आदीवासी बांधवांस दिवाळी निमित्त बुंदी,फरसाण आणि कपडे तसेच गरजेच्या वस्तू वाटप करत गुजराथी समाज महिला मंडळ च्या वतीने अनोखा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला .


एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अनेक सामाजिक संस्था हे विविध उपक्रम राबवित आहेत. ही बाब लक्षात घेवून गुजराथी समाज महिला मंडळ ने सर्व समाज बांधवांस आवाहन नुसार दिवाळी निमित्त आपल्या घरातील उपयोगी वस्तू जसे कपडे , साड्या आणि इतर घरगुती वैयक्तिक उपयोगाच्या वस्तू या एक ट्रक भरेल इतक्या जमा केल्या.इतकंच नाही तर सर्वांनी मिळून फरसाण आणि बुंदीचे 1 हजार पाकिटे तयार करून ती गरीब बांधवांना वाटप करत दिवाळी निमित्त हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते डॉ.रितेश पाटील यांच्या सांगण्यानुसार मग चोपडा तालुक्यातील आदिवासी पाडे पान शेवडी, अर्जुन पाडा, बढाई , कुंड्या पानी या वनवासी बांधवांस दिवाळी निमित्त बुंदी,फरसाण आणि कपडे तसेच गरजेच्या वस्तू वाटप करण्यात आल्या.यावेळी तेथील लहान मुले आणि आदिवासी माता बंधू आणि भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.दिवाळी निमित्त दिलेली ही अनोखी भेट म्हणजे आमच्यासाठी फार मोठी आदर भावना असून, आम्हाला आपलस केल्याची आनंदी भावना यावेळी आदिवासी बांधवांनी व्यक्त केली.

गुजराथी समाज महिला मंडळ अध्यक्षा भावना चौहान, सचिव रंजन पटेल,पूर्णिमा देसाई, माया दोशी ,किर्ती चौहान,जागृती मेहता, सेजल चौहान,गुजराथी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष राजू दोशी,मुकेश चव्हाण, नैलेश देसाई,हितेश शहा,सामाजिक डॉ.रितेश पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, आरोग्य सेवक अरविंद देशमुख, एस बी एन टाइम्स न्युज चे संपादक स्वामी पाटील,जयदीप शहा,राकेश पाटील,चंद्रशेखर नेवे, शुभम नेवे, प्रशांत देशमुख, प्रेमराज पवार, डॉ.विकास चौधरी, शशीकांत कोळी, रुपसिंग बारेला,किसन पावरा,अनुप चौधरी यांनी उपक्रम ठिकाणी सहकार्य केले.







