पाचोरा (प्रतिनिधी) – गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून देशासह राज्यात कोविड – १९ या महामारीने सर्वत्र धैमाण घातले आहे. अनेक वेळा लाॅकडाऊन करण्यात येवुन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला गेला. यातच ९ महिन्यांपासून शाळा, काॅलेज सुध्दा बंद ठेवण्यात आले आहे.


मागील महिन्याभरापासुन शिक्षकांना नियमित आपल्या नेमलेल्या शाळेवर जावुन तेथील स्वच्छते बाबत सर्वेक्षणासोबतच आॅनलाईन शिक्षणांवर भर देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिवाळी सणानिमित्त येथील गो. से. हायस्कूलचे कला शिक्षक एस. डी. भिवसने, सुबोध कांतायन व प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना व संबंधितांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या फलकावर सुरेख संदेश लिहुन कोरोना पासुन कसे सुरक्षित राहावे या सोबतच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.







