जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दृष्टिहीन बांधवाना राष्ट्रीय दृष्टिहीन संघातर्फे दिवाळी भेट निमित्ताने रेशन, मिठाई, पांढरी काठी तसेच गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आली. तेली समाज मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ विभागीय शाखा नाशिकच्या वतीने दृष्टिहीन बांधवांचा दिवाळी भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी अरविंद देशपांडे, शरद कोत्तावार, मनोज भांडारकर, नगरसेवक महेश चौधरी, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष खातेकर, महाराष्ट्र राज्याचे महासचिव बी.पी.जाधव, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी डी.एस.पाटील, उमेश सोनार, पिंटू डोळसे आदींच्या उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी संघाच्या कार्याचा गौरव करत जळगाव शहरातील दृष्टिहीन बांधवाना आमदार म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने गरजू बांधवाना घरकुल मिळवून देण्याचे आश्वासन दिले. राज्याचे महासचिव डी. पी. जाधव यांनी मार्गदर्शन तर केले. त्याचबरोबर २ गरजू अंध व्यक्तींना स्वयंरोजगाराची ५ हजार रु. धनादेश वाटप केले.
आभार उज्वला सोनवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संघाचे उपाध्यक्ष मंगेश शेवाळे, सचिव उज्वला सोनवणे, अध्यक्ष साहेबराव पगारे, महासचिव सुरेश गांगुर्डे, निवृत्ती डोळसे. आकाश बाविस्कर, स्वप्नील चौधरी आदींनी कामकाज पहिले. दिवाळी भेटीच्या कार्यक्रमास बाफना नेत्रपेढी व जैन उद्योग समूह, सागर चौबे, कन्हैय्या भावसार, दिलीप चौबे आदी दानशूर व्यक्तींनी दिवाळी भेटीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.







