जळगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील आसोदा येथील २१ वर्षीय तरुणाला बेकायदेशीर तलवार हे शस्र बाळगल्यामुळे एलसीबीच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, दत्तात्रय बडगुजर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर अश्यांचे पथक आसोद्याला पाठविले होते. तेथे वाल्मिक नगरमध्ये मारुती मंदिराच्या बाजूला प्रदीप सोपान कोळी (वय-२१) रा. नांदुरा वाडा, हा त्याच्या कब्जात बेकायदेशीररित्या एक लोखंडी धारदार पाते व ॲल्युमिनियमची मूठ असलेली तलवार 22 इंच लांब व आठ इंच मूठ असलेली बाळगताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम चार्ज पब्लिक 25 प्रमाणे जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








