• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पसंख्याक समाजाने ईडब्ल्यूएस १० टक्के आरक्षणाचा लाभ घ्यावा – अँड.शहेबाज शेख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2020
in जळगाव
0

जळगांव (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ व १६ मध्ये दुरुस्ती करून केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील सवर्ण नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी ईडब्ल्यूएस १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. ह्या निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नोकरी तसेच शिक्षण क्षेत्रात १० टक्के आरक्षणासोबत वय, परीक्षा फी व इतर सवलतीचा सुध्दा लाभ मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थी व्यक्तींकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सदर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर खुल्या प्रवर्गातील समाजासोबत अल्पसंख्याक समाजाने सुध्दा सदर प्रमाणपत्र बनवून ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.शहेबाज शेख यांनी केले आहे.

सदर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी पात्रता निकष म्हणजे, अर्जदाराच्या कुटुंबाचे (वडील, आई व १८ वर्षाखालील मुले) सर्व स्रोतांपासून चे एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.​ तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर कुठल्याही प्रवर्गाअंतर्गत (जसे की एससी, एसटी, ओबीसी, ईएसबीसी) येणाऱ्या लाभार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रात लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थी व त्यांच्या वडिलांचा टीसी / निर्गम उतारा, राशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, ८ अ / फॉर्म १६ / आयकर भरल्याचा पुरावा), अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा, स्वघोषणा पत्र, विहित नमुन्यातील अर्ज, ३ पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. सदर संपूर्ण कागदपत्रांसोबत अर्जदारांनी आपल्या रहिवासी क्षेत्रातील तहसील कार्यालयात सदरचा अर्ज जमा करून आपले प्रमाणपत्र बनवून घ्यावे.

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन यासह सर्व घटकांनी शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेणे गरजेचे असल्याने, अल्पसंख्याक समाजाने सदर आरक्षणाचा जास्तीत संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सुध्दा प्रदेश उपाध्यक्ष अँड.शहेबाज शेखशहेबाज शेख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


 

 

Previous Post

शेतकरी युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post

बेकायदेशीर तलवार बाळगल्यामुळे तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेकायदेशीर तलवार बाळगल्यामुळे तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon