जळगाव (प्रतिनिधी) – दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करतात, यामुळे हवेत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून यंदाच्या दिवाळीत जिह्यातील नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगावकरांना केली आहे.
याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहे. त्यात म्हटले आहे की, यंदाचा दिवाळी उत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून साध्यापद्धतीने साजरा करावा. फटाक्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषणाची पातळी वाढते, प्राण्यांना मोठा धोका पोहोचतो. त्यामुळे फटाके न फोडता दिव्यांची मोठ्या प्रमाणावर आरास करावी. उत्सव दरम्यान कोणतीही सार्वजनिक उपक्रम घेऊ नये. ऑनलाईन प्रसारण करावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम घ्यावेत. असेही परिपत्रकात म्हटले आहे.







