जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ येथील खडकरोड भागातील मोबाइलचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आवळल्या आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ येथील रजा टॉवर, खडका रोड भागातील स्टार मोबाइलला हे दुकान अज्ञात चोरट्याने १ जुळली रोजी फोडून त्यातील ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. तपासासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी पोहेकॉ शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, मुरलीधर बारी यांचे पथक स्थापन केले होते.
त्यानुसार पथकाला मिळालेल्या माहितीनुसार भुसावळच्या जाममोहल्ला भागातील फिरोज शेख अकील गवळी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून वरील गुन्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.







