जळगाव (प्रतिनिधी) – कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वित्त व लेखाधिकारी कोणत्या नियमान्वये नेमण्यात आली, परीक्षा विभागातील खरेदी-विक्री, तसेच निवृत्त लोकांना कोणत्या नियमानुसार कामे दिली जातात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर सचिव अँड. कुणाल पवार व भूषण भदाणे यांनी विद्यापीठाकडे माहिती मागितली आहे.
याबाबत माहिती देतांना अँड.कुणाल पवार म्हणाले की, विद्यापीठातील वित्त व लेख अधिकारी विवेक काटदरे यांना कोणत्या कायद्याच्या तरतुदीनुसार नियुक्त केले याबाबत विद्यापीठाने आजवर काही सांगितले नाही. तसेच या बेकायदेशीर नियुक्तीमध्ये कोणत्या व्यवस्थापन परिषदच्या सदस्याने हस्तक्षेप केला, विद्यापीठातील ओएसडी हे पद बेकायदेशीर असून त्यावर अमूल बोरसे यांना कोणत्या कायद्यानुसार बसविण्यात आले. याची माहिती अँड. पवार यांनी विद्यापीठाकडे मागितली आहे. तसेच बीएसएनलच्या वाय-फायची सेवासाठी किती खर्च झाला, त्यासाठी किती रुपयांची वर्क ऑर्डर काढण्यात आली, हे देखील अँड. पवार यांनी मागितली आहे.