पाचोरा (प्रतिनिधी) – येथील पोलीस स्टेशन येथे नूतन पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी आज गुरुवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी पाचोरा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला.
आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काम करणार असून यापुढे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वाचक बसविणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असून तालुक्यात गुन्हेगारी, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील कुणाची हय गय होणार नाही. तर चांगल काम करणाऱ्यांच्या पाठीशी देखील उभे राहू असेही ते यावेळी म्हणाले.