जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव – शिरसोली रोड दरम्यान असलेल्या जैन हिल्समधील पार्किंगच्या परिसरात बिबट्या मुक्तपणे संचार फिरत असल्याचा सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाला. मात्र या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की दि. २८ ऑकटोबर रोजी रात्री १. ३० ते १.४५ रात्रीच्या सुमारास परिसरात सन्नाटा असतांना अचानक बिबट्याने प्रवेश केला. जवळच असलेल्या सुरक्षारक्षक सुनील काशिनात चौधरी यांना हा बिबट्या दिसला. सुदैवाने कोणताच कर्मचारी वाहनतळावर फिरकतांना बिबट्याला आढळून आला नाही तर बिबट्याने त्याच्यावर हल्लाच चढवला असता. हा बिबट्या जैन हिल्स व जैन व्हॅली च्या एकूण १२५० च्या एकरमध्ये या बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. तो अधूनमधून कर्मचाऱ्यांना दिसत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याचा व्हीडियो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.







