पारोळा( प्रतिनिधी) – पारोळा शहरातील सोनवणे मेडिकल याठिकाणी कामाला असलेले कामगार यांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. पारोळा शहरासह तालुक्यातील समस्त केमिस्ट बांधव एकत्र येत कामगाराच्या परिवारास मदतीचा हात देत आर्थिक मदत केली. केमिस्ट बांधवानी केलेली मदत ही खरच सामाजिक बांधिलकी दाखविणारी आहे.
केमिस्ट बांधवांनी हा मदतीचा हात देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रसंगी नगरसेवक मनीष पाटील,पत्रकार अभय पाटील, माजी नगरसेवक सुनील पाटील,नितीन देसले, आणि तालुक्यातील केमिस्ट बांधव उपस्थित होते तर या सर्वांचे आभार मानत पारोळा शहराचे नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांनी अभिनंदन केले.








