• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील फ्लिपकार्ट पार्सलची बॅगेची चोरी करणारे दोघे अटकेत; एक संशयित अल्पवयीन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – फ्लिपकार्टचे पार्सलची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली होती. या गुन्ह्यातील संशयित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन आहे. दोघांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संजय सोपान पाटील (वय-३०) रा. ओम शांतीनगर, पिंप्राळा जळगाव हा तरूण गेल्या तीन ते चार वर्षांपासून फ्लिपकार्टचे पार्सल डिलेव्हरीचे काम करतो. काल २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फिल्पकार्टचे पार्सल बॅगमध्ये वस्तू डिलेव्हरीसाठी बाहेर पडला. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील रामा बिअर बार जवळील दृष्टी हॉस्पिटलमध्ये पार्सल देण्यासाठी आले. त्यांच्या बॅगमध्ये पार्सलचा सामान जास्त असल्याने त्यांनी बॅग दुचाकीवर ठेवून पार्सल देण्यासाठी गेले. दोन मिनीटात पार्सल देवून खाली आले असता त्यांच्या दुचाकीवरून आज्ञात चोरट्यांनी पार्सलची बॅग लंपास केली. बॅगेत विविध पार्सलचे एकुण ४२ हजार २०३ रूपये किंमतीचे सामान होते. संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सपोनि अशोक महाजन, संजय पवार, रमेश जाधव, पो.कॉ. परेश महाजन, पंकज शिंदे हरीष परदेशी यांनी रिंगरोडवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयित आरोपी कुणाल शिवदास पाटील (वय-१९, रा. हरीविठ्ठल नगर) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तर त्यांच्या ताब्यातील ऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीचा सामान आणि गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Previous Post

माजी मुख्यमंत्र्यांचे ‘त्या’ वक्तव्यावरुन घुमजाव

Next Post

जळगावातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

June 22, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon