” केसरीराज “ च्या भेटीत गायक, अभिनेता पियुष बोरसे यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) – खान्देशमधे अनेक तरुण रॅपर गायक असून स्वतःच्या करियरसाठी झगडत आहेत. त्यांच्या क्षेत्रात ते स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. अश्या सर्व रॅपर गायकांचे एकत्रीकरण करून त्याद्वारे सामाजिक सेवा करण्याचे उद्दिष्ट्य आहे. अशी माहिती रॅपर गायक व अभिनेता पियुष बोरसे यांनी ” केसरीराज ” च्या भेटीत दिली.

” तांडव ” , ” मनबावरे ” अश्या प्रसिद्ध मराठी रॅप गीतांचा गायक व अभिनेता पियुष बोरसे याने शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी ” केसरीराज ” साप्ताहिकाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी पियुष बोरसे यांच्यासह रॅपर संदीप मोरे व सहकारी पियुष यांना पुष्कर अत्तरदे, लोकेश देवराज, मनोज रंधे, धीरज नारखेडे यांचे नेहमीच सहकार्य असते. सुप्रसिद्ध रॅपर पियुष बोरसे व रॅपर संदीप मोरे यांचा ” केसरीराज ” चे संस्थापक, संपादक भगवान सोनार यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी कार्यकारी संपादक नरेश बागडे, वरिष्ठ उपसंपादक विश्वजित चौधरी, कार्यालय व्यवस्थापक कुणाल बारी, संगणक विभाग प्रमुख उमेश देशपांडे,शुभम सोनार, वैशाली बाविस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी पियुष बोरसे यांनी सांगितले की, तरुण कलावंतांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. स्वतःच्या कलेला महत्व द्यावे. प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस यश नक्की मिळते. त्यामुळे कलावंतांनी कधीही निराश होऊ नाही असेही त्यांनी सांगितले.

पियुष बोरसे हा फ्लॅपिंग आणि रॅप प्रकारात गायनाचे सादरीकरण करतो. अवघ्या सहा महिन्यात त्याने चार गीतांवर रॅप सॉंग्स प्रदर्शित केले आहेत. यामध्ये ” तांडव ” , ” मनबावरे ” हे रॅप सॉंग्स महाराष्ट्र राज्यभर प्रसिद्ध झाले आहे. त्यासह ” ओ मेरी राणी ” , ” आय अँम नॉट फेल ” ही गीते देखील प्रसिद्ध आहे. गेल्या सहा महिन्यात एक लाखापेक्षा अधिक लोकांनी पियुष बोरसेची गीते पाहिली व ऐकली आहेत. पियुष बोरसेचे विश्व वंदना प्रॉडकशन असून त्या अंतर्गत तो ही गीते स्वतः तयार करून प्रसिद्ध करतो. आगामी आकर्षण म्हणून तो ” दोस्ती तेरी ” यावर काम करीत आहेत. पियुष बोरसे हा पारोळा येथे सतीश पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याला भविष्यात मराठी हिपॉप आर्टिस्ट व्हायचे असल्याचा मनोदय त्याने ” केसरीराज ” कडे व्यक्त केला.
रॅपर गायक संदीप मोरे यानेही ” केसरीराज “शी संवाद साधला त्याचे मराठी गाणे ” अलग ” , रॅप सॉंग्स ” भोले ” हे प्रसिद्ध झाले आहे. तो शिरसोली, ता. जळगाव येथील तरुण असून तोही गायकी क्षेत्रात धडपडत आहे. त्यालाही ” केसरीराज ” परिवाराच्या वतीने सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी कलावंत लोकेश देवराज, जितेंद्र पाटील, मयूर माळी, बंटी ताडे आदी कलावंत उपस्थित होते.







