चोपडा येथील भाजपच्या बैठकीत पदाधिकारी ;

कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) – भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे नरेंद्रजी मोदी यांनी देखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर त्यांना पक्षाने पंतप्रधान पदावर बसवले आहे. भाजपा हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने कोणी जरी पक्ष सोडुन गेले तरी आमदार – खासदार सोडा, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता देखील पक्ष सोडणार नाही. असा विश्वास माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी चोपडा येथील भाजपच्या बैठकीत व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यात भाजपाने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे.चोपड्यात मात्र भाजपा कार्यकर्त्यांचा ऊस्फुर्त प्रतिसाद पाहुन नेत्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या बैठकीतून भाजपा कार्यकर्त्याची ताकद भक्कम असल्याचे सिध्द झाल्याचे तसेच चोपडा हा भाजपाचाच बालेकिल्ला कायम असल्याचे दिसून आले. चोपडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन सभापतीपद देवुन या आधिच पक्षाला बळ दिले आहे .भाजपातर्फे आज दि.30 रोजी चोपड्यात भाजप पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यात भाजपांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजपाचा बालेकिल्ला चोपड्यात आजही कायम दिसून आला.
जिल्हा परिषदच्या माध्यमातून चोपड्यात दोन सभापतीपद मिळाल्याने फार मोठी ताकद भाजपाला मिळाली आहे. त्यामुळे आजच्या भाजपातर्फे तालुका बैठकीत भाजपा पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. बैठकीत विजयराव पुराणीक, आ. गिरीष महाजन, संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार रक्षाताई खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे आदी उपस्थित होते.

आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, पक्ष वाढविण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी,प्रमोद महाजन गोपिनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतली आहे. एका विचार धारेवर पक्ष चालत आहे. मी आहे म्हणून पक्ष आहे. असे म्हणणारे आता इतिहास जमा झाले. आजही जे भाजप सोडत आहे. त्यांचीही दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
विजय पुराणिक म्हणाले की, कोविडच्या काळात भाजपा कार्यकर्त्यांनी लोकाची सेवा करित असतांना स्वतःचा जीव धोक्यात घालुन काम केले.
भाजपाचे काम करण्याचा उद्देश हा सर्व सामान्य लोकांची सेवा करणे हाच आसला पाहिजे. असे विजय पुराणिक म्हणाले. केंद्र सरकारमध्ये असलेल्या मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्यात ह्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असेही त्यांनी आवाहन केले. रक्षाताई खडसे यांनी म्हटले की, आपण भाजप विचारसरणीत वाढलो असून चार वर्षात खासदारकीच तिकीट मिळो ना मिळो आपण भाजपा सोबत राहु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरणीत वाढलो असून चार वर्षात खासदारकीच तिकीट मिळो ना मिळो आपण भाजपा सोबत राहु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.







