पारोळा (प्रतिनिधी) – दिव्यांगांच्या कल्याणासाठी मी सदैव कटीबंद्ध आहे. दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष उभारण्यासाठी आवश्यक तेवढा निधी माझ्या आमदार निधीतुन उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी दिले.
पंचायत समिती पारोळा कार्यालयात दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे उद् घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दिव्यांगांचा संदर्भातील शासकिय योजना माहीती सहज व सुलभ मिळण्यासाठी तसेच दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणुन या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या उद् घाटन कार्यक्रम प्रसंगी दिव्यांगांना स्वावलंबन कार्डाचे वाटप आ. चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. चिमणराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी, पंचायत समिती सभापती रेखा भिल, दिव्यांग प्रशिक्षणार्थी गुप्ता, गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, विस्तार अधिकारी सुनिल पाटील, पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील, पंचायत समिती सदस्य भिडु जाधव, पांडुरंग पाटील, नाना पाटील, शेतकी संघाचे सभापती राजेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, नगरसेवक अशोक चौधरी, गणेश पाटील, समाधान मगर, बाळु पाटील, आबा महाजन आदी. तसेच संबंधित अधिकारी व तालुक्यातील दिव्यांग उपस्थित होते.








