नरेश बागडे
जळगाव – कंजरभाट समाजाचे प्रथम माजी महापौर तथा अखिल भारतीय संहसमल भांतु समाज संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कविचंद भाट यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन दि.1 नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी 5.30 वाजता भाटनगर समाज मंदिर भाटनगर पिंपरी पुणे-17 येथ ेअखिल भारतीय संहसमल भांतु समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल मलके यांच्या हस्ते होणार असून प्र.अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे प्रकाश रावळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक दिनकर बागडे, पुणे जिल्हा प्रमुख हसन मलके, महा.प्रदेशचे महासचिव रामभाऊ बाटुंगे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अॅड.सुभाष माछरे,संस्थापक सदस्य देवदास चव्हाण,पुणे कॅन्टो बँकचे देवेंद्र भाट,पत्रकार नरेश बागडे,महा.प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती शकुंतला भाट,इंदिरा सेवा भावी संस्थेच्या महिलाअध्यक्षा श्रीमती मीना गुलाब भाट,राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा मेनका बाटुंगे, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा शितल भाट,सामाजिक नेत्या शोभा भाट,महासचिव पुणे जिल्हा शैलेश भाट, शक्ती प्रधान,विशाल मलके, नगरसेवक गोकूळ मलके, महा.प्रदेश युवाध्यक्ष अमय भाट, ह.भ.प.विष्णूपंत नेतले, महा.प्रदेशचे माजी युवाध्यक्ष धीरज तामचीकर, जळगावचे पत्रकार नरेश बागडे, पुणे युवाजिल्हाध्यक्ष करमसिंग भाट, गोविंद टिळंगे, पिंपरी मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश नंदलाल भाट, आदि मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून शासनाच्या नियमाप्रमाणे व सोशल डिस्टेन्सिंग ठेवूनच कार्यक्रम होणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाध्यक्ष विष्णू भाट यांनी ” केसरीराज “ शी बोलतांना दिली.








