जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भोईटेनगर येथील मालधक्यावर सिमेंट न उतरवता, दुसऱ्या ठिकाणी उतरवावे. यामुळे जनतेला धोका निर्माण झाला आहे. अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे.
मालधक्यावरील सिमेंट तातडीने दुसरीकडे स्तलांतर करावे यासाठी आ. राजूमामा भोळे यांचे पत्र देखील रेल्वेला दिले आहे. खासदार उन्मेष पाटील यांनीही फोन वरून रेल्वे प्रबंधक भुसावळ यांना सिमेंट स्थलांतर बद्दल चर्चा केली. मालधक्का स्तलांतरणाची मागणी होत आहे. मात्र, किमान सिमेंटची पोटे उतरविणे तरी बंद करावे अशी मागणी देखील प्रवीण जाधव यांनी केली आहे.








