नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार कोरोनाच्या संकटकाळात देखील सातत्याने राज्याचा दौरा करत आहेत. कोरोना संकटकाळ आणि शेतकऱ्यांचे परतीच्या पावसात झालेले नुकसान, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या या कामाबाबत जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांच्या या कार्याला सलाम देखील केला होता. पण ते ट्विट त्यांनी डिलीट केले आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले . पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले असल्याचे म्हटले होते.
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.
रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.







