तरुणांसह शूटिंग करणारा मित्रही गजाआड

जळगाव (प्रतिनिधी) – येथील मेहरूण भागामध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला लग्नास नकार दिला म्हणून सख्खा आतेभावाने जबरदस्तीने शिवाजी उद्यानातील रस्त्यात अडवून मिठीत घेत तरुणीच्या इच्छेविरुद्ध चुंबन घेतले. हा प्रकार मोबाईलमध्ये टिपणाऱ्या मित्रासह आतेभावाला पोलिसांनी नंदुरबारला पळून जाण्याच्या बेतात असतांना गजाआड केले.
तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नंदूरबार येथे राहणार सख्खा आतेभाऊ सचिन करण पवार हा एक वर्षांपूर्वी मला लग्नाची मागणी घालत होता. मात्र, आईने वय पूर्ण नसल्याच्या कारणावरून त्याला नकार दिला. लग्न करण्यासाठी सारखा मागे लागून पळवून नेईल अश्या धमक्या देखील तो देऊ लागला. सोमवारी २६ रोजी तरुणी शाळेच्या अँडमिशनसाठी जात असतांना मेहरूण मधील उद्यानाजवळ सचिन पवार याने त्याचा मित्र, सतीश रमेश पवार दोन्ही रा. नंदुबार यांनी तिला गाठले. सचिन पवार याने तिला बळजबरीने मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत चुंबन घेतले. यावेळी सतीश पवार याने हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला. त्याचवेळी तेथे तरुणीची आई, भाऊ, आले व त्यांनी तरुणीला सोडविले. घडलेल्या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात विनयभंग व पोक्सो कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.







