जळगाव (प्रतिनिधी) – दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून जिल्हास्तरावर दिव्यांग व्यक्ती व नागरिकांना दिव्यांग व्यक्ती संदर्भातील सर्व कायदे व योजनांची माहिती तालुकास्तरावर सहज व सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समित्यांमध्ये सल्ला व मार्गदर्शन कक्षाची स्थापना करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालयात आयोजित शिघ्र निदान व उपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील हे होते.
0 ते 6 वर्ष वयोगटातील समग्र मतिमंद मुलांच्या विकासासाठी जिल्ह्यात सर्व विशेष दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांगांसाठी शीघ्र निदान व उपचार केंद्र सुरू करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जळगाव येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिव्यांगांच्या शिघ्र निदान व उपचार केंद्रात दिव्यांग बालकांना वैद्यकीय सेवा, नर्सिंग सेवा, पोषण विषयक सेवा , थेरपीच्या सेवा व इतर आवश्यकतेनुसार सेवा उपलब्ध करून देण्यात बाबतही ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, उपाध्यक्ष एम. एम. महाजन, जि.प. चे प्रभारी समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंगे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, दिव्यांग विभागाचे समन्वयक भरत चौधरी, जिल्हा अपंग पुनर्वसन अधिकारी एस. पी. गणेशकर, मनपाचे शेख वसीम शेख हुसेन, मुख्याध्यापक संजय बोरसे यांच्यासह शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल पाटील सर यांनी शिघ्र निदान व उपचार केंद्रा बाबत सविस्तर माहिती सांगितली. सूत्रसंचालन करून आभार मुख्याध्यापक बोरसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनंत महाजन प्राचार्य विकास तंत्रनिकेतन , राहुल पाटील, अरुण हडपे, अक्षय कुलकर्णी, सरोज बडगुजर, दौलत पवार , सौ. वैशाली भोळे , गोविंद पाटील, सुनील सोनवणे, दिनकर ठाकरे , अनिल सैंदाने, श्रीमती शांताबाई मानकर आदींनी परिश्रम घेतले.