जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोउद्योग विभागाने बी. के. बेंद्रे यांची जळगावला जिल्हा विशेष लेखा परीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
बी. के. बेंद्रे हे अहमदनगर येथे सहकारी संस्था (साखर) मध्ये तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग १ ला रुजू होते. आता शासनाने २३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार बेंद्रे यांनी जळगावी बदली केली आहे.