मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपवर जोरदार टिकास्त्र केले. त्यांनंतर आता भाजपचे नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी तर त्यांच्या दोन्ही सुपुत्रांची तुलना बेडकाच्या पिलांशी केली. त्यानंतर आता निलेश राणे आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो.’ अशी टीका निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.







