वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – आज आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरूण भगवान पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला .
माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे तसेच आमदार लताताई सोनवणे यांनी अरूण पाटील यांचे स्वागत केले अरूण पाटील हे माजी आमदार कैलास पाटील यांचे खंदे समर्थक होते, परंतू त्यांनी मला अनेक ठिकाणी डावलले माझ्या कुठल्याही शब्दाला ते पायीक राहिले नाही माझ्या सारखे बरेच लोकांवर अन्याय केले आहे. यावेळी त्यांनी बोलून दाखवले. माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे विद्यमान सौ.आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्यावर तालुक्यातील होत असलेला विकासावर विश्वास ठेऊन प्रवेश केला यावेळी अरूण पाटील यांनी देखील आमदार लताताई सोनवणे माजी आमदार प्रा.चंद्रकांत आण्णा सोनवणे यांचे स्वागत केले यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र पाटील पंचायत समिती सदस्य उपसभापती एम.व्ही.पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, प्रताप आण्णा पाटील, आडगाव अँड.एस.डी.सोनवणे, तालुका संघटक सुकलाल कोळी, शहर प्रमुख नरेश महाजन, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, चोपडा साखर कारखाना संचालक भरत पाटील, आडगाव नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेवक प्रकाश राजपुत, सुनिल बरडीया , गणेश पाटील, सुनिल पाटील, नितिन पाटील, नितिन चौधरी, सर नंदलाल पाटील, महेंद्र पाटील ( विटनेर कर )जगदीश मराठे, प्रविण जैन यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते .







