जळगाव (प्रतिनिधी) – अनुभूती रेसिडेंशीयल स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन सेंटर’ अंतर्गत वर्षभरात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची, संशोधनाची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जाता. यामध्ये विज्ञान, गणित, इंजिनियरिंग, कृषि तंत्रज्ञानासह विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारले जातात. विद्यार्थी हा लहानपणापासून संशोधक बनावा शास्त्रज्ञांचा अभ्यास व अनुभूती इनोव्हेशन सेंटर अंतर्गत नवीन शोध कसे लागू शकतील व चांगले मॉडेल निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या सेंटरमध्ये होत असते या उद्दीष्टा अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या सेंटर अंतर्गत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातील विविध मॉडेलची निर्मिती त्यात प्रामुख्याने मेकॅनिकल अँडव्हांटेज म्हणजे कमी उर्जेतून मोठ्या वजनदार गोष्टी कशापद्धतीने उचलू शकतो, मशीनीविना व माणसाऐवजी सामानाची ने आण दूरपर्यंत सहज पद्धतीने कसे पोहचवता येउ शकते हे उपकरण, माणसाशिवाय व शक्तीविना लोखंडांच्या वस्तूंना विना बांधता कसे उचलता येउ शकते, या मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, गावातील घरातील सांडपाणी एकत्र करून स्वच्छ करून परत वापरात कसे आणता येऊ शकते यासंबंधीचे मॉडेल, अंधारात चोरांना पकडण्यासाठीचे थिफ डिटेक्टर, पेशंट बेडवरूनच बसल्या जागी आपल्या आवाजाने रूममधील पंखे, लाईट चालू किंवा बंद करू शकतो यासाठीचे व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम, घरातील विद्युत उपकरणासंबधीचे फॉल्ट लोकेशन डिटेक्टर यासारखी उपकरणे अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात बनवून घेण्यात आली आहेत. अनुभूती शाळेने आपल्या शैक्षणिक पद्धतीत स्टेम पद्धतीचा म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, स्थापत्यशास्त्र (इंजिनियरिंग) व गणित यांचा अवलंब यात केला आहे. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान पद्धती व वरील उपकरण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून त्यांच्यातील संशोधकाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यातून या उपकरणांची निर्मिती झाली आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तीन दिवसीय कार्यशाळेसाठी कलकत्ता येथून कृष्णेंन्दु चक्रवर्ती यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मायनोमिटर म्हणजे लेव्हल नळीपासून तापमान मोजता येणारे तंत्र, साऊंट वेव्ह म्हणजे ध्वनीतरंग कसे होतात त्याचे मॉडेल, समुद्रामध्ये चक्रीवादळ यासह विविध वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारावर अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी 30 च्यावर मॉडेल साकारले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वर्षभरातील निर्माण केलेल्या उपकरणांचे सादरीकरण विज्ञान प्रदर्शनात करण्यात आले. प्रदर्शनासोबतच एकदिवसीय कार्यशाळेत अनुभूतीच्या इयत्ता 5 वी ते 8 वीच्या सुमारे 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पाच शाळांना आमंत्रित करण्यात आले होते. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनानुसार अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पाच वर्षापासून विज्ञान, गणित, इंजिनिअरिंगमध्ये मॉडेल सादरीकरण स्पर्धा घेतली जात आहे. विज्ञान प्रदर्शन, कार्यशाळा व यासोबतच जलव्यवस्थापन विषयावर वैज्ञानिक मॉडेल स्पर्धेचं आयोजनही करण्यात आले होतं. यामध्ये प्रथम क्रमांक भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल व जळगाव येथील उज्वल स्प्राउटर स्कूलने व्दितीय क्रमांक पटकावला. तर अनुभूती इनोव्हेशन सेंटर अंतर्गत वर्षभरात बनवलेल्या उपकरणांमधे कुशाग्र गुप्ता, सम्यक जैन, तेजस जैन यांनी बनवलेल्या ‘पाणी शुद्धीकरणा’च्या उपकरणाला प्रथम विजेतेपद मिळाले तर व्दितीय विजेतेपद राजेश्वरी पाटील, जान्हवी धोटे, हर्षिता नाहाटा यांनी बनवलेल्या ‘रोपवे कन्वेअर’ या उपकरणाला मिळाले या विज्ञान दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन संजविनी हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमोल सेठ, इयत्ता 8 वीची विद्यार्थीनी संजविनी सेठ यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे प्राचार्य जे. पी. राव, भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ कृष्णेंन्दू चक्रवर्ती, यु. व्ही. राव, स्नेहल जोशी यांच्यासह स्कूलचे सहकारी उपस्थित होते. ‘विज्ञान आणि अध्यात्म’ याविषयावर भाष्य करताना डॉ. अमोल सेठ म्हणाले की, मुलांच्या व्यक्तीमत्त्व व बौद्धीक कौशल्य विकास होणे महत्त्वाचे आहे. मेंदुचे कार्य कसे चालते हे सांगताना मेंदु हा सामान्य व विशेष काही करू शकणारा पण सुप्त स्थितीत असलेला असे दोन प्रकारे कार्य करतो. विशिष्ट संकल्पपूर्तीचे चित्र डोळ्यासमोर ठेऊन आपले उद्दिष्ट जर चांगले असेल तर ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवता येते. ते सरावातून होते. संगीत, योग यातून मेंदुचा विकास करता येतो असे सांगता विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
फोटो कॅप्शन. अनुभूती स्कूलमध्ये आयोजीत वैज्ञानिक उपकरणांच्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांकडून उपकरणांची माहिती घेताना कृष्णेंन्दु चक्रवर्ती.