धानोरा (प्रतिनिधी) – चोपडा येथिल रामपुरा भागातील राहीवाशी दिनेश रमेश जाधव हे दि. २० रोजी दहिगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते.परत येतांना त्यांचा हा मोबाईल हरवला.येथिल झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले एस. पी. महाजन हे नियमितपणे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर या मार्गावर फिरायला गेले असता. त्यांना हा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी हा मोबाईल सांभाळून ठेवला. जाधव यांचा ज्यावेळेस फोन आला तेव्हा महाजन यांनी सांगितले की, तुमचा मोबाईल सुरक्षित आहे. यावेळी पोलिस पाटील दिनेश पाटील, ग्रामसेवक दिपक भामरे, तलाठी खुशबु तडवी, एस पी महाजन, प्रशांत सोनवणे, सुरेंद्र महाजन यांनी गणेश रमेश जाधव यांच्या ताब्यात मोबाईल दिला.








