जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्याचे नाव स्वकर्तृत्वाने महाराष्ट्रभर गाजवणारे लोकनेते मा. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाची माहिती आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब यांनी जाहिर केल्यानंतर दिर्घकालीन संभ्रम संपल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

मा. शरद पवार, मा. ना. अजितदादा पवार, मा. ना. जयंत पाटील, मा. सुप्रियाताई सुळे, मा.अँड. रविंद्रभैय्या पाटील तसेच सर्व मान्यवरांच्या साथीने राष्ट्रवादी कॉंग्रेसध्ये प्रवेशानंतर
जनाधार असलेले मा. एकनाथराव खडसे शेतक-यां साठी, सर्वसामान्यांसाठी पुन्हा झोकून काम करतील या विश्वासानेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव मा विधानसभा क्षेत्रप्रमुख राजेश पाटील, मा जिल्हा युवकअध्यक्ष रमेश पाटील, महानगर सचिव अँड कुणाल पवार, युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, कार्यालय चिटणीस संजय चव्हाण यांनी या निर्णयाबद्दल मा. एकनाथराव खडसे यांचे अभिनंदन करुन राष्ट्रवादी विचार पोहचविण्यासाठी स्वागत केले.







