जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वे बोर्ड नवी दिल्ली स्थित कार्यकारी संचालक विवेक श्रीवास्तव यांनी रेल मदत पोर्टल वरील या कार्याचा आढावा घेतला होता व तक्रारीचे यथोचित निवारण करण्याविषयी सूचित केले होते रेल्वे बोर्डाच्या सर्वेक्षणात तक्रारीचे योग्य निवारण केल्याबद्दल भुसावळ विभागाने प्रथम ,पूर्वोत्तर रेल्वे द्वितीय, तर पश्चिम रेल्वेने तृतीय क्रमांक पटकाविला होता.
भुसावळ विभागातून सत्यजित अब्राहम सेतूमाधवन मुख्य तिकीट निरीक्षक तक्रार निवारण यांनी रेल मदत पोर्टल वरील तक्रारीचे यथोचित व योग्य निवारण केल्याबद्दल पुरस्कृत करण्याची सूचना रेल्वे बोर्डातर्फे केली गेली होती त्यानुसार सत्यजित सेतू माधवन यांना फेब्रुवारी 2020 मध्ये मध्य रेल्वेच्या उपमहाप्रबंधकांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार होते परंतु काही अपरिहार्य कारणास्तव व नंतर लागू झालेल्या लॉकडाउनमुळे हा पुरस्कार वितरणासाठी भुसावळ विभागात पाठवण्यात आला आज दि. 21 ऑक्टोबरला झालेल्या एका समारंभात भुसावळ विभागाचे अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा यांच्या हस्ते सत्यजित सेतु माधवन यांना मानपत्र व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील उपस्थित होते. वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी तक्रार निवारण विभागात कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करून दुसरा विभागाला गौरव प्राप्त करून देण्याचे आव्हान केले आहे.








