देवेंद्र फडणवीस यांची नाथाभाऊंच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) – नाथाभाऊंना जर माझ्याविरुद्ध तक्रार होती, तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या असत्या. खडसे सांगतात ते अर्धसत्य आहे. कोणीही पक्ष सोडून गेला तर, पक्षाचे नुकसान होते, मात्र कोण्याच्या जाण्याने पक्ष थांबला नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यामध्ये पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद आदी नऊ जिल्ह्यामध्ये पुरामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. पुराची परिस्थिती पहिली त्यावर पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी, शेतकऱ्याचं पुरामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या विषयावर फडणवीस म्हणाले की, खडसे सांगतात ते अर्धसत्य आहे. त्यावर आज बोलणार नाही योग्य वेळ आल्यावर बोलेल. भाजप मजबूत आहे. जनता भाजपसोबत आहे. तसेच भाजपचा कोणताही आमदार फुटणार नाही. असेही ते म्हणाले. तसेच जळगाव मनपा बरखास्तीची विषयावर त्यांनी बोलणे टाळले.







