जळगाव (प्रतिनिधी) – शेमलदे,ता. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे आज दि. 21 रोजी नायब तहसीलदार झामरे व पोलीस निरीक्षक शिंदे यांना रेती ठेक्यांच्या निविदा काढून स्वस्त रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी जिल्हा उपाध्यक्ष अँड. पवनराजे पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले .
सर्वच शासकीय तसेच वैक्तिक लाभाची कामे सुरु असतांना गोर गरीब जनतेला घरकुलांच्या तसेच गोठे व सौचालायाच्या बांधकामासाठी सामान्य जनतेला 1800 ते 2000 रुपये ब्रास मिळणारी वाळू 3500 ते 4000 रुपये भावाने खरेदी करावी लागत आहे. तरी शासकीय निविदा काढून अवैध रेती बंद होऊन सर्व सामान्य जनतेला घरकुलांच्या बांधकामासाठी स्वस्तात रेती उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसेल .
” वाळू रगडीता तेल हि गळे ” ह्या म्हणीचा आज असा अर्थ लागत आहे का शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महागाची वाळू विकत घेऊन खऱ्या अर्थाने जनतेचे तेल निघत आहे .
बांधकाम व रेतीचे ठेके यामध्ये सुसूत्रता आणून वाळूचा काळा बाजार थांबवावा व लोकांची होणारी आर्थिक लूट तसेच शासनाचा करोडो रुपयांचा बुडणारा महसूल वाचवावा म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची मागणी आहे का लवकरात लवकर रेतीच्या निविदा काढून सर्व सामान्य जनतेची लूट थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सदर वेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहाणे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.पवन पाटील ,कार्यालयीन सचिव कल्याण पाटील, ब्रिजलाल पाटील, श्रीराम पाटील, रवी दांडगे, जिल्हा युवा सरचटणीस प्रवीण दामोदरे, तालुका अध्यक्ष सईद खान, तालुका कार्य अध्यक्ष राजेश ढोले, शहर अध्यक्ष ऋषिकेश पाटील, हर्षल पाटील, शुभम पाटील, निलेश पाटील, उपप्रसिद्धी प्रमुख सारंग पाटील, राहुल पाटील, भूपेंद्र सावकारे, अविनाश सावकारे, योगेश पाटील, प्रशांत पाटील, अजिंक्य पाटील, कपिल पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.







