जळगाव (प्रतिनिधी) – भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला. एकनाथराव खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते आता प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांनी एकच जलोष्ष खडसेंच्या घराबाहेर आज केला. फटाके फोडून आनंद व्यक्त करत `नाथाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है` आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.
राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु असताना अखेर भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला असून आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे.
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. राजीनामा दिल्यानंतर खडसेंच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर माझा नेता माझा अभिमान असे बँनर झळकविण्यास सुरू केले आहे. तर फेसबुक, व्हाॅटसअपवर देखील खडसेंचे फोटो राष्ट्रवादीच्या बँनरवर दाखविल्याचे पोस्ट व्हारल होवू लागले.
मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवास स्थानी तसेच जळगाव येथील निवास्थाना बाहेर खडसेंच्या समर्थकांनी घोषणा देत जल्लोष केला. तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.







