जळगाव (प्रतिनिधी) – माझ्यावर बाबांनी कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. जनतेची सेवा करण हेच आमच काम आहे. मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही, असे खासदार रक्षा खडसे म्हणाले.
अनेक दिवसापांपासून एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी पक्षात जाणार अशी चर्चा होती. आज त्यांनी भाजप सदस्याचा राजीनामा देत देवेंद्र फडणवीसावर घणाघाती आरोप केले आहे. याबाबत त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसेंनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी बाबांनी घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत असून तो दुःखद आहे. मी भाजप मध्येच असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असे मत व्यक्त केले.
नाथाभाऊं पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय. 40 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं राजीनामा दिला आहे असे खडसे म्हणाल्या.
माझ्यावर बाबांनी कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. जनतेची सेवा करण हेच आमच मत आहे. मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही. कुणाबाबत देखील आपण असं भाकित आपण करु शकत नाही. आता आपण भाजपमध्येत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.







