जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून विषय ठरलेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या तिघांमधून आज राजेंद्र घुगे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून रंजना सपकाळे यांचे नाव अंतिम करण्यात आले. आमदार राजूमामा भोळे व भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी तीन इच्छुकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.

राजेंद्र घुगे पाटील यांनी स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात या तीन इच्छुकांच्या मुलाखती झाल्याचे सांगण्यात आले. स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षिय पातळीवर अन्य दोन इच्छुकांना कसे समजावून सांगावे हा पेच महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्यापुढे होता. त्यामुळे शहरातील सध्याच्या राजकीय वातावरणाचा सारासार विचार करून घुगे पाटील यांना प्राधान्य देत अन्य दोघांचे समाधान करण्यात यश आले. घुगे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांना बोलावण्यात आले. त्यानंतर या सभापती पदासाठी रंजना सपकाळे यांचे नाव अंतिम करण्यात आले. त्यांनी देखील मनपात अर्ज दाखल केले आहे.
यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, महापौर भारती सोनवणे, विशाल त्रिपाठी, भगत बालाणी, उपमहापौर आश्विन सोनवणे, आबा कापसे , भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, मुकुंदा सोनवणे, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर, सरिता नेरकर, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, जितेंद्र मराठे, अतुल बारी, भरत सपकाळे, दिपमाला काळे, गायत्री राणे, प्रतिभा पाटील, अमित काळे यांच्यासह आदी उपस्थित होते.







