धुळे – सुरत राष्ट्रीय महामार्गावरील घटना ; 6 ठार तर 35 जण गंभीर जखमी

नंदुरबार (प्रतिनिधी) – धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात आज पहाटे 3 वाजता जळगाव हून सुरत कडे जाणाऱ्या शुभम खासगी ट्रॅव्हल्स व किंग ट्रॅव्हल्स धडक होऊन अपघात झाल्याने
कोंडाईबारी घाटातल्या दर्ग्या जवळ पुला वरून

30 ते 40 फुट खोल दरीत बस कोसळल्याने अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 35 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असुन या अपघाताने खळबळ उडाली आहे. जखमीना बाहेर काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले होते.

अपघाताती खबर मिळताच नवापूर व विसरवाडी पोलीस पथकाने मदतकार्याला सुरुवात केली आहे. ट्रॅव्हल्स बस दरीत कोसळल्याने मोठा आवाज झाला होता. आवाज ऐकून वाहतुक पोलीस परिसरातील ग्रामस्थ यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले आहे.जखमींना विसरवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर गंभीर अवस्थेतील रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची नोंद विसरवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मयताची ओळख पटविण्यात येत आहे. नेमका अपघात कसा व कशा मुळे झाला याचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले असून त्या नुसार पोलीस अधिक तपास करत आहे.
या बस मध्ये जळगाव येथील प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे.









