एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – येथील सिंधी कॉलनी परिसरातील जीत बेकरीजवळ लोकांचे मोबाईलवर आयडी डेव्हलप करून आयपीएल क्रिकेट मॅच चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल मॅचचे सट्टा – बेटिंग घेतांना दोघांना अटक केल्याची घटना दि. १९ रोजी ५. ३० वाजता घडली. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील जीत बेकरीजवळ रोहीत गुलशन गेरा हा लोकांचे मोबाईलवर आयडी डेव्हलप करून आयपीएल क्रिकेट मॅचचे सट्टा – बेटिंग करत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळाल्याने सफोनि. अतुल वंजारी, आनंदसिग पाटील, विजय बावसकर, पोकॉ. किशोर पाटील, चेतन सोनवणे, सुधीर कांबळे, सफो. रामकृष्ण पाटील यांनी सापळा रचून नॅशनल हायवे जवळ सिंधी कॉलनीकडे जाणाऱ्या रोडलगत जीत बेकरीजवळ एक जण मोबाइल घेऊन फोनवर चॅटिंग करतांना पोलिसांना उभा असलेला दिसला, त्यामुळे मिळालेल्या बातमीची खात्री झाल्याने पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या जवळ दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाइल व आयपील-२०२० प्रॉफीटकिंग डाऊनलोड केलेले सट्टा – बेटिंगचे तारखा व रक्कम नोंदविलेली दिसून आल्याने रोहीत गुलशन गेरा (वय-२५) रा. लीलावती अपार्टमेंट प्लॉट. क्र. १४, मोहाडी रोड, जळगाव व रोहितला मदत करणारा आनंद गांधी, रा. अभियंता कॉलनी,महाबळ रोड या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघांविरुद्ध मुबई जुगार कायदा कलम- १२ अ, तसेच भादंवि. कलम – १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.