जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे झालेले हत्याकांड हे अतिशय दुर्देवी व निदनीय घटना असून सदर घटनेतील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्यात यावी व सदर केसचा निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी टायगरगृपतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टायगर गृप भारतचे संस्थापक, अध्यक्ष – जालिंदर जाधव , अध्यक्ष – तानाजी जाधव व खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील सदस्य गौरव उमप, मनोज बाविस्कर, प्रणव शर्मा, कुणाल बारी, राहुल उमप, विवेक नेतलेकर, बाळा निंबाळकर,भरत लोंढे, जितेंद्र निंबाळकर तसेच टायगर ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य आदी निवेदन देतांना उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चार बालकांचे निर्घृण हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्यात यावी व सदर केसचा निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जळगाव टायगरगृपतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जळगाव टायगर ग्रुपतर्फे देण्यात आला आहे.