जळगाव ;- शहरातील एका तरुणाला क्रेडिट कार्डचा पासवर्ड विचारून ३२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती विशाल प्रकाश खर्चाने (वय-३३) रा. सम्राट कॉलनी, जळगाव यांचे अक्सीस बँकेत खाते आहे. ८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्यावेळी सांगण्यात आले की, मी अक्सीस बँकेतून बोलत आहे असे सांगून खात्याची संपुर्ण माहिती जाणून घेतली. तसेच बँकेतून अक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड घेतले आहे असे सांगून संपुर्ण माहिती विशाल खर्चाने यांनी दिली. त्यानुसार समोरील अज्ञात व्यक्तीने २१ हजार आणि ११ हजार रूपये असे दोन वेळा व्यवहार करून एकूण ३२ हजार रूपये परस्पर खात्यातून काढून फसवणूक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.