जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर येथील जामनेरपुरा, इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील, क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार यांची क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेत, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ उपाध्यक्षपदी निवड महासंघाच्या सभेत जळगांव येथे नुकतीच करण्यात आली.
या निवडीबद्दल जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, डी.व्ही.चौधरी , कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव राजेश जाधव, सहसचिव प्रवीण पाटील यांनी अभिनंदन केले.







