भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील पंचशीलनगर भागात छोटू उर्फ मोहम्मद कैफ जाकीर (वय 16) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली तणाव वाढल्याने कडक बंदोबस्त तैनात करू पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे .
या भरवस्तीत झालेल्या खूनाच्या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे. आज घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधिक्षक कुमार चिंथा , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत , सपोनि अनिल मोरे ,सपोनि मनीष गोटला व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी भेट दिली
शेख समीर शेख जाकिर (रा. पंचशीलनगर भुसावळ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी धम्मा सुरळकर, समीर ऊर्फ कालू बांगर, आश्वीन ऊर्फ गोलू बांगर , शुभम खंडेवार सर्व रा.पंचशील नगर भुसावळ यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या विरोधात गुरन 882/2020 भा.द. वि . कलम 302,323, 143,144, 147, 148, 149, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक दिलीप भागवत करीत आहे.