जळगाव/भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पुन्हा खुनाने हादरले असून एकाचा खून झाल्याने गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मो.शेख जाकीर पंचशीलशील नगर, भुसावळ असे मयताचे नाव आहे. चार ते पाच संशयीतांनी रॉडने हल्ला करून तरुणाचा खून केल्याने भुसावळ पुन्हा चर्चेत आले आहे. या हल्ल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र या घटनेनंतर भुसावळातील गुन्हेेगारी पुन्हा चर्चेत आली असून हल्लेखोरांचा भुसावळ बाजारपेठ पोलिस शोध घेत आहेत.
भुसावळ शहरांमध्ये गुन्हेगारी वरचढ ठरत असून रात्री अकरा वाजेला पंचशील नगरांमध्ये डोक्यात रोड टाकून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद शेख जाकीर असे मयताचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिस अधिकारी घेत असून घटनास्थळी मोठा जमाव जमला असल्याची माहिती मिळत आहे.
त्याच्या मित्रांनी डॉक्टर मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. तेथे काही जणांनी तोडफोड केल्याची माहिती मिळत असून पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह गोदावरी फाऊंडेशनच्या डॉक्टर उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आला आल्याचे कळत आहे.