जळगांव (प्रतिनिधी) – येथे भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरची बैठक आज दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रविवार रोजी दुपारी 4 वाजता जळगाव येथील भाजपाचे वसंतस्मृती कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीत भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे यांनी भाजयुमो पदाधिकाऱ्यांना संघटन पर मार्गदर्शन केले. महानगर जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी यांनी भाजयुमो मागील कार्यक्रमाचा आढावा घेऊन सक्रिय कार्यकर्ता कसा असावा या बाबत अनमोल मार्गदर्शन केले. तसेच उल्लेखनीय कार्यकरणार्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष आनंदभाऊ सपकाळे यांनी युवा जोडो अभियान राबविण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या बैठकीला भाजपा जळगांव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जळगांव शहराचे आमदार मा.श्री.राजुमामा भोळे, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिपकभाऊ सूर्यवंशी, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.कपिलभाऊ पाटील, भाजपा सरचिटणीस मा.श्री.नितीन भाऊ इंगळे व डॉ.राधेश्यामभाऊ चौधरी तसेच भाजयुमो जिल्हाध्यक्ष मा.श्री.आनंदभाऊ सपकाळे इत्यादींच्या प्रमुख उपस्थिती होती. सदर बैठक संपन्नते साठी भाजयुमो सरचिटणीस जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, स्वामी पोतदार , चिटणीस प्रतीक शेठ, विनय चौधरी, अश्वीन सैंदाने, रोहित सोनवणे , सागर जाधव , प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, भुषन पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, पुष्पेंद्र जोशी कोषाध्यक्ष-ऋषिकेश येवले, मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, सागर पोळ , नितेश पानसर, महेश लाठी , गौरव येवले , पंकज सनानसे, बाळू मराठे, जयंत चव्हाण, देवेश जाधव, सिद्धार्थ रणवडे, शुभम घाडगे इत्यादी भाजयुमोच्या कार्यकर्ते उपस्थित केले.