जळगाव (प्रतिनिधी) – येथील मुजे महाविद्यालयाच्या जवळ पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांना अंदाजे 17 वर्षाची मुलगी विमनस्क अवस्थेत आढळून आली होती. त्यांनी तीला पोलीस स्टेशनला आणुन तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुपुर्द केले. हि सुखद घटना रविवार 11 ऑक्टोबर रोजी घडली.
एम जे कॉलेज पॉइंट ड्युटीला असलेले पोलीस महेश पवार यांना माहिती मिळाली की, एक मुलगी वय अंदाजे 16 ते 17 वर्षे ही विमनस्क अवस्थेत फिरत आहे. तिला तिचे नाव विचारता उत्तर देता येत नाही असे दिसून आले. तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी महिला कर्मचारी स्वाती बगे यांना रवाना केले व अनोळखी मुलीस पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली. तीचा पत्ता तिने सांगितला मात्र तो चुकीचा निघाला. तरीही तिच्या फोटोने वेगवेगळ्या पोस्टे च्या ग्रुपवर व कर्मचार्यांना माहिती देऊन तिचा खरा पत्ता व कुटुंबीय यांचा शोध घेण्यात आला. तिला तिची आई सकिना बी शेख रहीम (वय 52 वर्षे )राहणार -उमर मशिदीजवळ अक्सा नगर मेहरूण, जळगाव यांना आधार कार्ड द्वारे तपासणी करून परिसरातील प्रतिष्ठित नागरिक हाजी शेख युसुफ, एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष जीया बागवान यांचे समक्ष माननीय पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पडताळणी करून पोलीस नाईक, विनोद सोनवणे चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने कुटुंबीयांची भेट घालून संबंधीत तरुणीला ताब्यात दिले.