यावल (प्रतिनिधी) – तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सभागृहात आज (दि. ११) रविवार दुपारी २ वाजता येथे तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार रमेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी देशातील शेतकरी व सर्वसामान्य माणसांवर ओढवलेल्या संकटाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यात खालील विषयाबाबत गांर्भीयाने विचार विनिमय करण्यात आले.
१ )भाजपा शासित केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले ३ काळे कायदे रद्द करणे.
२ )प्रत्येक तालुक्यातून शेतकरी शेतमजूर आडते कृषी उत्पन्न बाजार समिती च्या व्यापारी यांची सह्यांची मोहीम राबवणे, आदी विषयांवर बैठकित चर्चा झाली.
यावेळी यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, पंचायत समितीचे माजी उपसमापती छोटू पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, यावल काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, फैजपुरचे शहराध्यक्ष रियाजभाई, युनूस पिंजारी, अमोल भिरुड, अनुसुचित जाती विभागाच्या जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, शाम पाटील, श्याम मेघे, हाजी गफ्फारशाह, संदीप सोनवणे, राहुल तायडे, नगरसेवक गुलामरसुल, जाकीरभाई, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर खान, अनिल जंजाळे, तौफिक भाई, जावेद जनाब, अकिलसेठ, नईमभाई, युवक काँग्रेसचे इम्रान पहेलवान, रहेमान भाई, विक्की पाटील, भुपेश जाधव, बशीर तडवी, रामराव मोरे, सद्दाम शाह, अशपाक शाह, गोकुळ कोळी, सत्तार तडवी, दिलीप पाटील, रहेमान तडवी, इज्जू पिंजारी, राहुल बारी, भरतसेठ चौधरी, अनिल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.